मतीन पटेलचे घर, कार्यालय बुलडोझरने भुईसपाट!

नाशिक कॉर्पोरेट  जिहाद प्रकरण; याच घरात राहिली होती संशयित निदान खान

छत्रपती संभाजीनगर: देशभरात गाजलेलं नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण यातील आरोपी निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी संभाजीनगरातील नारेगाव परिसरामध्ये एका घरी आश्रय दिला होता. ते घर आणि कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज भल्या सकाळी जमीनदोस्त केले.

दरम्यान, महानगरपालिकेने त्या घराला अवैध बांधकाम संबंधित नोटीस दिली होती. मात्र, वेळ देऊनही कोणताही जबाब न आल्यामुळे अखेर छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेने मतीन पटेलच्या घर आणि कार्यालयासह ज्या घरात निदान खान राहिली होती ते घरही जमीनदोस्त केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *